Sunday, 12 February 2023

Woman T20 World Cup उद्या होणार महिला विश्वचषकात भारत विरूध्द पाकिस्तान महामुकाबला

 Woman T20 World Cup उद्या होणार महिला विश्वचषकात भारत विरूध्द पाकिस्तान महामुकाबला


काल शुक्रवारपासून महिला T20 विश्वचषक स्पर्धेला अखेर सुरुवात झाली आहे. याच विश्वचषकातील पहिला सामना यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत खेळवला गेला. या सामन्यात आफ्रिकेला 3 धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत भारतीय संघ 12 फेब्रुवारीपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. या स्पर्धेची सुरुवात भारतीय संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत करणार आहे. उद्या म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातच होणार आहे.

भारत आणि पाकिस्तानचे संघ 'ब' गटात आहेत. या गटात इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज हे संघही आहेत. पाच संघांच्या या गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. त्याचप्रमाणे अ गटातही 5 संघ असून त्यापैकी दोन संघांना उपांत्य फेरीचे तिकीट मिळणार आहे. 'ब' गटातून भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचतील.

कुठे आणि कधी होणार हा सामना?

भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघांमधील हा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सामना सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. डिस्ने + हॉटस्टार अॅपवरही लाईव्ह सामना बघता येईल.

असा असेल भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड. .

असा असेल पाकिस्तान संघ

बिस्माह मारूफ (कर्णधार), आयमान अन्वर, आलिया रियाझ, आयशा नसीम, ​​फातिमा सना, जवेरिया खान, मुनीबा अली, नशरा संधू, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शम्स, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन.

0 Comments: